भिकू वाघेरे यांच्या स्मृतीला अभिवादन
पिंपरी, ता. ६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. ६ ) अभिवादन करण्यात आले.
पिंपरी वाघेरे येथील भिकू वाघेरे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
------------
