26.89°C Pune
Monday, September 14
Breaking News:
image

अवीट गोडीच्या गाण्यांतून कविवर्य ना धो महानोरांना स्वराजंली

पिंपरी, ता. १६ : पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशन आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नुकत्याच आयोजित " नभं उतरू आलं " या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कविवर्य ना. धो महानोरांना स्वरांजली वाहिली.


यावेळी कविवर्य यांच्या सुकन्या सरला महानोर- शिंदे, हभप शेखर महाराज जांभूळकर, डॉ. अमरसिंह माने, कल्चरलचे अध्यक्ष विजय भिसे, कुंदा भिसे, धारूतात्या बालवडकर, शिल्पा बिडकर, डॉ. स्मिता बारवकर आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी सतीश इंगळे, मनीषा निश्चल,धनंजय पवार, भारती न्यायाधीश यांनी गायन केले. यावेळी कविवर्य महानोर यांनी रचलेल्या "चिंब पावसान रान आबादणी.. , जांभूळ पिकल्या झाडाखालीढोल.., भरलं आभाळ पावसाळी .., राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं..,लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला.., राजसा जावळी जरा बसा...,दूरच्या रानात केळीच्या बनात..,घन ओथांबून येती.. आम्ही ठाकर ठाकर.. मी रात टाकली.., अशी अवीट गोडीची अजरामर गाणी सादर करून रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळवली. 

या कार्यक्रमासाठी मिहीर भडकमकर यांनी संगीत संयोजन केले. वाद्यांची साथसंगत अमन सय्यद (कि-बोर्ड), विक्रम द्रविड (पॅड), अभिजित भदे ( तबला) पद्माकर गुजर (ढोलकी), पिनाक न्यायाधीश (गिटार) यांची लाभली. अध्यक्ष विजय भिसे यांनी प्रास्ताविक केले. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले.

------------