आधुनिक काळातही विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ ही दुर्दैवी- व्याख्याते गणेश शिंदे
पिंपरी, ता. ३१ : आधुनिक काळातही शाळेत येण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते,ही दुर्दैवी बाब आहे .लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रोपोलीस सारख्या सामाजिक संस्थेच्या मदतीने ही पायपीट थांबण्यास मदत झाली, असे उद्गगार व्याख्याते गणेश शिंदे यांनी पारगाव ( जि. नगर) येथे काढले.
लायन्स क्लब ऑफ़ मेट्रोपॉलिसच्या वतीने श्री सदगुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल मेहेकरी (जि अहमदनगर) विद्यालयातील पारगाव येथुन दररोज ६ कि.मी.पायपीट करीत येणा-या २० सावित्रीच्या लेकींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री गणेश शिदे बोलत होते.
यावेळी प्राचार्य गोगरे,लायन्स क्लब ऑफ मॅट्रोपाॅलीसचे अध्यक्ष विश्वजीत बेडगे,खजिनदार जगराम कनोजिया सायकल अॅक्टिव्हिटी चेअरपर्सन भरत इंगवले,ज्येष्ठ लायन्स सदस्य अनुप ठाकूर नागेद्र शेरेगर,संदीप कामठे ,पुंडलिक दरेकर, राजेंद्र टकले, राजेंद्र गराडे, रामचंद्र माने, तसेच लायन्स क्लबचे वरिष्ठ सन्मानित सभासद व पारगावच्या उपसरपंच तारा भोसले, शिक्षण समिती अध्यक्ष शेवत गुड, प्रशांत शिदे यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅक्टिव्हिटी चेअरपर्सन भरत इंगवले म्हणाले की, पारगाव या गावातून येणा-या विद्यार्थ्यांनी आपली अडचण गणेश शिंदे यांच्याकडे व्यक्त केली . शिंदे यांनी माझ्या कानावर ही अडचण सांगितली. त्याची दखल घेत ही मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
लायन्स क्लब ऑफ मॅट्रोपाॅलीसचे अध्यक्ष विश्वजीत बेडगे यांनी ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे आभार मानले. शाळेचे प्राचार्य गोगरे सर यांनी प्रास्ताविकातून या परिसरातील शैक्षणिक व भौगोलिक परिस्थितीचा आढावा सांगितला चौधरी यांनी
सूत्रसंचालन केले. शिदे यांनी आभार मानले.
-----
