24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

आकुर्डीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात


पिंपरी, ता. २३ : आकुर्डी स्थित डॉ. डी वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

प्राध्यापिका पल्लवी सोमठाणे, योग प्रशिक्षक यांनी योगाचे महत्त्व समजावून सांगून विद्यार्थी आणि शिक्षकाकडून विविध आसने योग्य पद्धतीने करून घेतली. आपल्या जीवनामध्ये आपण योगाचे महत्व जाणून नियमित योगासने केल्यास आपण विविध आजारांना सहजतेने हरवू शकतो तसेच सुदृढ जीवन जगू शकतो, असे सोमठाणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. योगा केल्याने तुमचे शरीर, मन आणि आत्मा यांना जोडू शकते असे मनोगत व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. शिल्पा चौधरी यांनी योगा नियमित केल्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते, असे सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मुकेश मोहिते आणि राष्ट्रीय सेवा योजने चे प्रा. पवनकुमार वानखडे यांनी केले.

---