26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

' योग्य समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी '

 पिंपरी, ता. १० : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर ऑफिसर्सचे प्रशिक्षण थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) स्मृती कामगार भवन येथे झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना  निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू बोलत होते.


 यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार , पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, आशा होळकर, सेक्टर ऑफिसर समन्वयक अजिंक्य येळे यांच्यासह सेक्टर ऑफिसर तसेच संबंधित कक्षाचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.


 निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी प्रशिक्षणास उपस्थित सेक्टर ऑफिसर्सना मार्गदर्शन केले. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर गर्दीचे योग्य नियोजन करावे, पार्किगच्या सुविधेचा आढावा घ्यावा, मतदान केंद्राच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी तसेच मतदारांसाठी त्या ठिकाणी असणाऱ्या मुलभूत सुविधा आदीबाबत आढावा घ्यावा तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व शांत वातावरणात होण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत योग्य समन्वय ठेवावा आदी सूचना यावेळी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी दिल्या.


   पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे ४५ सेक्टर ऑफिसर, चिंचवड विधानसभा मतदासंघाचे ४८ सेक्टर ऑफिसर,सूक्ष्म निरीक्षक, निवडणूक निरीक्षक यांचे समन्वयक मुकुंद पवार, हरविंदरसिंग बन्सल आदी प्रशिक्षणास उपस्थित होते.

-------