26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

वीरशैव समाजाचा डॉ सुलक्षणा शिलवंत यांना एकमुखी पाठिंबा

पिंपरी, ता. ११ : '' लिंगायत वीरशैव समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांनी सर्वप्रथम महिलांना सन्मानाची वागणूक दिली आणि महिला भगिनींना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची समाजाला शिकवण दिली. त्या तत्वांना अनुसरून वीरशैव लिंगायत समाज पिंपरी विधानसभा मतदार संघात डॉ सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी उभा राहील यात शंका नाही'', असे मत सामाजिक कार्यकर्ते रमेश कोरे यांनी व्यक्त केले. 

वीरशैव लिंगायत समाजाच्या शंभरहून अधिक प्रतिनिधींनी आज पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांची भेट घेतली यावेळी समाज बांधवांनी सुलक्षणा शिलवंत यांना महात्मा बसवेश्वरांचे चरित्र भेटी दाखल दिले. 

रमेश कोरे यावेळी म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी समाजातील मागासलेल्या घटकांना व गावकुसा बाहेर ठेवलेल्या लोकांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी सामाजिक संघर्ष केला होता यात सवर्णांकडून महिला भगिनींना देखील दुय्यम स्थान दिले जात होते त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांनी याबाबत कठोर भूमिका घेत महिलांनाही पुरुषांसारखा अधिकार आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे म्हणून सामाजिक लढा दिला.


महात्मा बसवेश्वरांच्या या शिकवणुकी प्रमाणे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीरशैव लिंगायात समाज डॉ सुलक्षणा शिलवंत यांनाच मतदान करेल असे रमेश कोरे यांनी यावेळी सांगितले. 

या भेटीदरम्यान प्रामुख्याने मल्लिकर प्यारासबरी, वेणू गोपाल नायर, सिद्धेश्वर तोडकर, कुंडलिक गणगीर, बाळासाहेब कांबळे, सुभाष जोशी, रोकडे सर, वासुदेव दोराई, बाबुराव सावंत आधी प्रमुख उपस्थित होते.

------------------