26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

वेळेचे व्यवस्थापन, नव तंत्रज्ञान आत्मसात करा - डॉ. सुधीर हसमनीस

पिंपरी, ता. २३ : '' उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना वेळेचा सदुपयोग करून नवीन तंत्रज्ञान आणि सामाजिक बदलांचा अभ्यास केला पाहिजे. तरच पुढील आयुष्यात यशस्वी व्हाल'', असा कानमंत्र टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक डॉ. सुधीर हसमनीस यांनी विद्यार्थ्यांना नुकताच दिला.

  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) साते मावळ येथील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने (शैक्षणिक वर्ष २०२४-२५) एमबीए विद्यार्थ्यांसाठी 'दीक्षारंभ' सोहळ्यात डॉ. हसमनीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, उद्योजकता आणि व्यवस्थापन विभाग अधिष्ठाता प्रा. डॉ. सुनील पारीक, ग्लोबल हेड लर्निंग अँड डेव्हलपमेंट, बिझनेस परफॉर्मन्स, टॅलेंट मॅनेजमेंट आणि एमएसएन लॅब्स ग्रुपचे संचालक शिवानंद मोहन, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, व्यवस्थापन विभाग अधिष्ठाता डॉ. अजय शर्मा, कृषी व्यवसाय आणि फार्मास्युटिकल व्यवस्थापन विभाग अधिष्ठाता डॉ. अमित पाटील, विपणन विभागाचे जमीर मुल्ला आदी उपस्थित होते.

 बदलत्या व्यवसायातील परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज, सर्वांगीण विकासाचे महत्त्व, आणि नवोपक्रम आणि उद्योजकता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाढीला सर्वोच्च प्राधान्य पीसीयू देत आहे असे डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले.

 आधुनिक व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी नाविन्य आणि उद्योजकता महत्त्व विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यास डॉ. पारीक यांनी प्रोत्साहित केले. त्यांनी व्यवस्थापन पद्धतींचे भविष्य घडवण्यात तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करून विद्यार्थ्यांना सज्ज होण्याचे आवाहन डॉ. पारीक यांनी केले.

  संघटनात्मक संस्कृतीला आकार देण्यासाठी एचआरची विकसित भूमिका, टॅलेंट मॅनेजमेंटचे महत्त्व आणि व्यवसायाच्या कामगिरीवर शिक्षण आणि विकासाचा बदल स्वीकारण्यास व्यावसायिक प्रवासात जुळवून घ्यावे असे शिवानंद मोहन यांनी मार्गदर्शन केले. 

 पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्कूल ऑफ मॅनेजमेंट चे एचओडी डॉ. अजय शर्मा यांनी स्वागत केले. डॉ. अमित पाटील यांनी आभार मानले

----------------------------------------------