30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

थेरगाव येथे विश्वगुरू संत महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात

पिंपरी, ता. १ :'' स्त्री - पुरुष असा भेद करू नका. अस्पृश्यता बाळगू नका, असा उपदेश विश्वगुरू संत महात्मा बसवेश्वर यांनी त्यांच्या अनुयायांना दिला '', असे प्रतिपादन कर्नाटक येथील लिंगायत समाजाचे गुरु अतिथ बसवा शिवशरण महाराज यांनी बुधवारी (ता. ३० ) थेरगाव येथे केले. 


विश्वगुरू संत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव येथील बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोमेश्वर महाराजही उपस्थित होते. या कार्यक्रमास माजी मंत्री डॉक्टर शिवानंद हूल्ल्याळकर, ज्येष्ठ वकील सुभाष हूल्ल्याळकर, पॅनल जज रमेश उमरगे, उद्योजक जनार्दन जाधव, माजी नगरसेवक तुषार हिंगे, तानाजी बारणे, विनायक गायकवाड, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आर. पी. कल्याणी आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाविकांना महाप्रसादाचे वाटपहि करण्यात आले सुमारे एक हजारहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. 


अतिथ बसवा शिवशरण महाराज म्हणाले, '' विश्वगुरू संत महात्मा बसवेश्वर हे समतावादी होते. त्यांनी पुरुष आणि स्त्रियांनाही दीक्षा दिली. जगातील विविध देशांच्या कानाकोपऱ्यात लिंगायत समाजाचे लोक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. '' 


बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने थेरगाव येथे गोशाळाहि चालविण्यात येते. येथे खाटिकाकडे जाणाऱ्या सुमारे १९ गायी आहेत. तसेच आजारी, अपंग गाईंचेही संगोपन केले जाते. ज्या कोणाला अशा गाईंबाबत माहिती असेल तर प्रतिष्ठानकडे या गाई ते देऊ शकतात. तसेच चिंचवड येथे धनेश्वर मंदिराजवळ गरीब आणि गरजू लोकांना मोफत जेवण देण्यात येते. प्रतिष्ठांनचे अध्यक्ष मानतेश जालिहाळ यांनी संयोजन केले.  

---------------