तेलंग हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयास नॅकचा बी + श्रेणी
पिंपरी, ता. ६ : कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. अरविंद ब. तेलंग इन्सटीट्युट ऑफ हॉटेल
मॅनेजमेंटला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेने(नॅक) केलेल्या या तपासणी समितीकडून 'बी+ ग्रेड' प्राप्त झाली आहे. नॅककडून २.६४ (सीजीपीए) गुण मिळवत हे यश मिळविल्याची माहिती प्राचार्य डॉ. अजय कुमार राय यांनी नुकतीच दिली.
महाविद्यालयाने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती आणि इतर सदस्यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. गेली १९ वर्षे पिंपरी चिंचवड मध्ये यशाची परंपरा कायम ठेवत डॉ. अरविंद बी तेलंग इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडविण्यात अग्रसेर ठरली आहे. १००% उत्कृष्ट निकाल आणि कॅंपस प्लेसमेंटच्या माध्यमातून १००% देशात व परदेशात नोकरी आणि इंटर्नशीप असा संस्थेचा नावलौकिक मिळवला.
संस्थेतील जास्तीत जास्त विद्यार्थी पुणे, मुंबई व गोवा येथील पंचतारांकित हॉटेल्स मध्ये नोकरी करीत आहेत, तर काही विद्यार्थ्यांची अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, मालदीव, फ्रान्स येथे निवड झाली आहे. या वर्षी संस्थेतील व्दितीय वर्षातील १२ विद्यार्थ्यांची फ्रान्समध्ये इंटर्नशिपसाठी निवड झालेली
आहे. एवढेच नाही तर दरवर्षी संस्थेचे विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत देखील असतात.
---------------
