31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

शर्वरी डिग्रजकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध !

पिंपरी, ता. ८ : स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाची शर्वरी डिग्रजकर - पोफळे यांनी आपल्या शास्त्रीय गायनाची सुरुवात राग पुरिया कल्याणने केली. त्यानंतर मत्स्यगंधा नाटकातील नाट्यपद सादर केले. "आम्हा न कळे ज्ञान" या अभंगाने सांगता केली. त्यांच्या गायनाने उपस्थित रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यांना तबल्यावर रोहित कुलकर्णी आणि हार्मोनियम साथ राजीव तांबे यांनी केली.


     प्रारंभी स्नेहल सोमण यांच्या नृत्यरंग सादरीकरणाने झाली. सोमण यांची नृत्य शारदा कथक कला मंदिर ही संस्था आहे. स्नेहलजी आणि त्यांच्या शिष्यांनी प्रथम गणेश वंदनेने सादरीकरणाची सुरुवात केली. त्यानंतर शिखर अनवट ताल, ठुमरी, पंच महाभूत प्रस्तुती, सरस्वती वंदना, अष्टपदी आणि शेवट फ्यूजन प्रकाराने सादरीकरणाचा शेवट केला.

   कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात "स्वरस्वप्न" व्हायोलिन समुहाने आपले सादरीकरण केले. गुरू स्वप्ना दातार यांच्या सुश्राव्य निवेदनाखाली संपूर्ण शिष्यवर्गाने हा कार्यक्रम सादर केला. व्हायोलिनच्या समूह सादरीकरणाची सुरुवात "पंचतुंड नररुंड" या नांदीने झाली. त्यानंतर शिष्य समूहाने रागमाला, भूप, सूलताल, भीमपलास, किरवाणी, तुर्कीश मार्च सादरीकरण केले. यानंतर भक्तीसंगीत अभंगाच, देशभक्तिपर गीते, फोक संगीत प्रकार आणि शेवटी सूरत पिया या प्रसिद्ध गाण्याने सांगता केली. प्रेक्षक व्हायोलिनच्या संगीतात रममाण झाले होते.

    व्हायोलिन समूह वादनात श्रेयस, मानस, आरोही, सानविका, अर्जुन, कार्तिकेय, वेधा, मनस्वी, मंजिरी, अनुराग, आर्या, रिओना, सिद्धी, मल्हार, ईशा, रिया, पार्थ, आशिष, दिवीज, तनिष्का यांचा सहभाग होता. तबला साथ मनोज देशमुख, रोशन चांदगुडे, पखवाज भागवत चव्हाण, ताल वाद्य शुभम शहा, ड्रम्स तुषार देशपांडे, कीबोर्ड तुषार दीक्षित आणि ध्वनी नियंत्रण नामदेव पानगरकर यांनी केले.

   स्वर सागर महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी थिगळे, हंबीर आवटे, श्रेयश आवटे, मृगेश नटराजन, गजानन शंकर चिंचवडे, पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, सुरेखा कुलकर्णी, अस्मिता सावंत, अनिल दराडे, सोनाली थोरवे, सुनील पोटे, शिरीष कुंभार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले

सूत्रसंचालन अभिजीत कोळपे यांनी केले. 

-------------------------------------------