26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

श्रमिकांची गांधीजींच्या मार्गाने आंदोलन उभे करावे : यशवंत भोसले

पिंपरी, ता. १ : भांडवलदाराच्या आणि ठेकेदाराच्या दबावाखाली कामगार व शेतकरी विरोधी धोरण तयार होत असेल तर सरकारवर श्रमिक व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी गांधीजींच्या मार्गाने आंदोलन उभे केले पाहिजे आणि ही चळवळ पिंपरी चिंचवडमधून सुरू करण्याचा निर्धार राष्ट्रीय कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी गुरुवारी (ता.१) पिंपरी येथे केला.


महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून यांच्या वतीने संत तुकारामनगर येथील संत तुकाराम महाराज हॉल येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यानिमित भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला साम टीव्ही चे पत्रकार गोपाळ मोटघरे,पीटीआयचे पत्रकार झैद मेमन, अल्फा लावलचे राहुल लांडगे, कैलास वाहन कंपनीचे बाळासाहेब गावडे, संभाजी विरकर, रमेश वाहिले, शंकर गावडे, राजू पवार, ईश्वर यादव, अमोल घोरपडे, राजू आरणकल्ले, अर्ष जागीरदार तसेच वायसीएम हॉस्पिटलचे सर्व महिला कर्मचारी उपस्थीत होते. तुकारामनगर येथून निघालेल्या बाईक रॅलीचा समारोप पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. तसेच कामगार नगर व संत तुकाराम नगर परिसरात पायी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये भोसरी, चाकण, आळंदी, पिंपरी,चिंचवड, सणसवाडी,शिक्रापूर एमआयडीसी परिसरातील हजारो कामगार व नागरिक सहभागी झाले होते.


 यावेळी भोसले म्हणाले, '' खाजगी कंपन्यांमध्ये सरकारच्या विविध खात्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच महानगरपालिका,नगरपरिषद,पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यामध्ये तरुणांना कायद्यानुसार कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याऐवजी कंत्राटी कामगार कायद्याचा दुरुपयोग करून सर्रास श्रमिक तरुणांची आर्थिक व शारीरिक पीळवणूक होत आहे. त्यामुळे देश आर्थिकदृष्ट्या देश कमकुवत होत आहे. श्रीमंत आणि गरीब यामध्ये खूप मोठी दरी वाढत चालली आहे. ठेकेदार व सरकारी अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार श्रमिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. सरकारने ज्यांनी उभी हयात श्रमिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य घालवले आहे, अशा त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन श्रमिकांच्या व शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे बनवले व त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या संरक्षण दिले तर समाजातील संतुलन टिकणार आहे. सरकारी अधिकारी न्याय देत नाहीत, न्यायालयामध्ये न्याय मिळण्यास विलंब लागतो, राजाश्रय मिळालेले ठेकेदार या सर्व साखळीमध्ये श्रमिक व शेतकरी जखडला गेला आहे. 

---------------