24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

शालेय जीवनात लीडर्स घडल्यास देशाला फायदेशीर ठरेल- उन्नीकृष्णन

पिंपरी, ता. १४ : आपल्याकडे अपघाताने नेते घडले जातात. विद्यार्थ्यांना लीडरशिपचे प्रशिक्षण किंवा अनुभव शालेय जीवनात मिळाल्यास याचा समाजाला फायदा तर होणारच आहे. शाळेने सुरु केलेल्या उपक्रमातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणाचे प्रशिक्षण मिळेल आणि यातून लीडर्स तयार होतील, यामुळे देशाला फायदा होईल . असा विश्वास आयआयटी बॉम्बे - मोनॅश रिसर्च अकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. उन्नीकृष्णन यांनी नुकतेच निगडी येथे व्यक्त केला.

 निगडी येथील सीएमएस इंग्लिश मीडियम हायर सेकंडरी स्कूलच्या वतीने आयोजित कऱण्यात आलेल्या स्टुडन्ट मेंटॉरशिप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीएमएसचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर नायर, खजिनदार पी अजयकुमार, उपाध्यक्ष पी श्रीनिवासन, कलावेदि विभागप्रमुख पी.व्ही भास्करन,पी.सी विजयकुमार, जॉय जोसेफ, एम.के मोहनदास, टी. व्ही ओम्मान, जी रवींद्रन, प्राचार्य डॉ. बिजी गोपकुमार पिल्ले, मुख्याध्यापिका चैताली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी अध्यक्ष श्री. विजयन म्हणाले, '' विद्यार्थ्यांमध्ये अनन्य साधरण गुण असतात. त्या गुणांचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे, हा मुख्य हेतू या कार्यक्रमाचा आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम संपूर्ण भारतातून प्रथमच सीएमएस स्कूलमध्ये होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बीजी पिल्ले यांनी केले. सूत्रसंचालन सजिता पिल्ले यांनी तर आभार सोफिया मार्गारेट यांनी मानले.

------------