26.89°C Pune
Monday, September 14
Breaking News:
image

शिक्रापूर शाखेची कोजागिरी पौर्णिमा उत्साहात

शिक्रापूर, ता. २२ : ' एबीबीएम 'च्या शिक्रापूर शाखेने, कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधुन शिक्रापूर भागात कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. आपले संस्कार, आपले सण साजरा करण्याची प्रथा पुढे चालू ठेवण्यात आली. 


या कार्यक्रमाला धार्मिकतेचे स्वरूप देत देवीचे श्रीसूक्त पठण, पारंपरिक भोंडला, सामूहिक रामरक्षा,हनुमान चालीसा पठण करत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने कोजागिरी साजरी केली. तालुका अध्यक्ष आदित्य कुलकर्णी, शाखा अध्यक्ष माधव कुलकर्णी, महिला आघाडी अध्यक्ष सौ दिपाली जोशी यांनी आयोजन केले होते तसेच जोशी गुरुजी, दुर्गादास जोशी, शरद कुलकर्णी, राजेश पांडे, आंबेकर साहेब, पांडे काकू, सुचीता गुंडेकर, दीप्ती कुलकर्णी, सुचेता कुलकर्णी हे पदाधिकारी व मोठ्या संख्येने श्रोते शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी येथून उपस्थित होते. दुग्ध प्राशन व स्नॅक्स चा प्रेक्षकांनी आस्वाद घेतला.


शिरूर तालुक्यातील अनेक गावातून अनेक ब्राह्मण कुटुंबे अखिल भारतीय ब्राह्मण संघाशी जोडले जात आहेत ही ब्राह्मण समाजाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरत असल्याचे दिसून आले.  


-----------