शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाईची मागणी
पिंपरी, ता. १५ : शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई तातडीने करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे गुरुवारी (ता. १५) केली.
यासंदर्भात नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, '' दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते. परंतु यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही कारण सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, व या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले यातील कचरा साफ न केल्याने स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन तुडुंब भरून जागोजागी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असून नागरिकांना वाहने चालवताना, रस्त्याने चालताना अडचणीना सामोरे जावे लागत आहे तसेच या साचलेल्या पाण्याने घणीचे साम्राज्य पसरत असून नगरिकाना आरोग्याच्या समस्येलादेखील सामोरे जावे लागत आहे.
ही खूप गंभीर बाब असून, आवकाळी पावसाने जर शहराचे हे हाल होत असतील तर मोठ्या पावसात शहराची अवस्था जलमय होईल व संपूर्ण शहराला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे वर नमूद बाबीचा विचार करता पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई करण्याचे त्वरित आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे हि विनंती. ''
------------
------
