25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

शहरात पुढील ४८ तास उष्णतेची लाट येण्याची शक्यता

पिंपरी, ता. २५ : '' सध्या सर्वत्र तीव्र उष्णतेचा पारा चढला आहे. देशभरात पुढील ४८ तास उष्णतेची लाट, गरम आणि दमट हवामान कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराला देखील या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे. उन्हात बाहेर पडताना डोकं झाकून ठेवावं, पुरेसे पाणी प्यावं आणि थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करावा '', असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.


हवामान खात्याच्या माहितीनुसार २६ एप्रिलनंतर महाराष्ट्रात उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत गरम हवामानाचा सामना करावा लागणार आहे. म्हणून तीव्र उन्हाच्या लाटेपासून वाचण्यासाठी दुपारी १२ ते ४ दरम्यान घरच्या बाहेर पडू नका. थेट सूर्यप्रकाश टाळा महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचे असेल तर डोके झाकून ठेवा. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



चौकट - 


⦁ अशी घ्या काळजी :

१) ६५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती

२) १ वर्षांखालील व १ ते ५ वयोगटातील मुले

३) गरोदर माता

४) मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती

५) अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती


—-----


उष्माघात होण्याची कारणे -

१ ) उन्हाळयामध्ये मजुरीची कामे फार वेळ करणे. 

२) कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.

३) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. (जसे बेकरी, भेळीच्या भट्टया, विटभट्टी)

४) घट्ट कपड्यांचा वापर करणे. 


अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.


—----


⦁ लक्षणे -


१) थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे

२) भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा गोळे येणे

३) रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी.




⦁ प्रतिबंधात्मक उपाय :-


अ) हे करा :


१) वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.

२) कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.

३) उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

४) जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे (तहान लागली नसेल तरीही).

५) सरबत प्यावे, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

६) अधूनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी.

७) वर नमूद केलेली लक्षणे आढळल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व डॉक्टराच्या सल्ल्याने उपचार सुरु करावा

८) उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवल, फेटा, उपरणे, छत्री इ.चा वापर करावा.

९) घरे थंड ठेवण्यासाठी पंखे, कुलर यांचा वापर करण्यात यावा, तसेच वाळयाचे किंवा सुती ओले पडदे व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या / झरोके उघड्या ठेवण्यात याव्यात.

१०) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. शक्य असल्यास माठ वापरावा,

११) कामाच्या ठिकाणी शक्य असल्यास सावली करून थेट सूर्यप्रकाशाचा संबंध टाळावा,

१२) गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार असलेले कामगार यांची जास्त काळजी घेण्यात यावी.




ब) हे करु नका -


१) लहान मुले किवा पाळीव प्राण्याना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाह‌नात ठेऊ नये. तसेच

२) दारे, खिडक्या बंद करून ठेऊ नये.

३) दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीमध्ये उन्हात जाणे टाळावे.

४) गडद रंगाचे, घटट्ट, जाड कपडे, व कृत्रीम घालण्याचे टाळावे.

५) तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे दु. १२.०० ते ३.३० या कालावधीमध्ये टाळावीत 


⦁ असे घ्या उपचार


१) रुग्णास वातानुकुलीत खोलीत अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत,

२) रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

३) रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.

४) रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टटया ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत.

५) आश्यकते नुसार सलाईन द्यावे.




चौकट -


काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना –

शक्यतो दुपारच्या वेळेत (१२ ते ४) घराबाहेर जाणे टाळावे

भरपूर पाणी प्या व शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका

हलके व सूती कपडे परिधान करा.

गरम पदार्थांचे सेवन करू नका 

गरज असल्यास छत्री, टोपी, गॉगलचा वापर करा.

सार्वजनिक ठिकाणी लागणाऱ्या सुविधा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येत आहे


—------------


कोट 


शहरातील शाळा, वर्कशॉप्स व सार्वजनिक कार्यक्रमांबाबतही काळजी घ्यावी. उष्णते संदर्भातील सर्व उपचार पालिका रुगणालयात उपलब्ध आहेत. या काळात काही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील महानगरपालिकेच्या रुग्णालयाला भेट देऊन उपचार घ्या. 


डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

----------------