24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

शहराच्या काही भागात गुरुवार ते शनिवार विस्कळीत पाणीपुरवठा


पिंपरी, १३ : पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मोशी, चऱ्होली, चोवीसावाडी, वडमुखवाडी, चिखली, डुडुळगाव, भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा दि. १३ ते १५ जून २०२४ दरम्यान अनियमित, विस्कळीत तसेच कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  

पुणे पाटबंधारे विभागांतर्गत असणाऱ्या खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक- २ यांच्यामार्फत इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यांची पावसाळ्यापूर्वी करावयाची आपत्ती व्यवस्थापनाची कामे सुरु आहेत. त्या अनुषंगाने आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीमध्ये करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे दि. १३ जून ते १५ जून २०२४ दरम्यान मोशी, चऱ्होली, चोवीसावाडी, वडमुखवाडी, चिखली, डुडुळगाव, भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे. 

--------------