24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

“ स्वच्छता अंगीकारूया, आजारपण पळवूया ” मोहिमेला सुरवात


पिंपरी, ता. ११ : आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली असून स्वच्छता राखून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने १ जुलै २०२४ पासून पावसाळ्यात स्वच्छता आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी “स्वच्छता अंगीकारूया, आजारपण पळवूया” या महत्वपूर्ण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नेहरूनगर या परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ८०० किलो पेक्षा जास्त कचरा संकलन करून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.


     या मोहीमेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन वसुंधरेच्या संवर्धनाची आणि स्वच्छतेची शपथ घेऊन शहराला स्वच्छ करण्याचा निश्चय केला.

-------------