26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात


पिंपरी, ता. १२ : '' महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली असून या संस्कृतीचे जतन होणे गरजेचे आहे. पाश्चात्य संस्कृतीचा अंगीकार करण्यापेक्षा संतांच्या विचारांचा अंगीकार केल्यास जीवनात सकारात्मक बदल होतात,'' असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले.


पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, महाराष्ट्र राज्य रिलायन्स स्मार्ट बाजारचे बिझनेस हेड संतोष शिंदे, महाराष्ट्र राज्य रिलायन्स स्मार्ट बाजारचे रिजनल मार्केटिंग हेड रमेश सावरकर, महाराष्ट्र राज्य रिलायन्स स्मार्ट बाजार, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त अण्णा बोदडे, पिं. चि. स्मार्ट सिटी लिमिटेडचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सोशल मिडिया स्टार शॉर्ट फिल्म अॅक्ट्रेस कावेरी घंगाळे, मोटिवेशनल सोशल मीडिया स्टार पियुष सजगणे, जस्ट फॉर हेल्थ टीम, मर्दानी खेळ असोसिएशनचे संजय बनसोडे, सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर बुद्धीतेजा बोदडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, '' भारतीय संस्कृतीचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवण्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन महापालिकेच्या करण्यात आले असून हे कौतुकास्पद आहे. या माध्यमातून मुलांना संतांनी केलेले कार्य आणि आपली संस्कृती समजण्यास मदत होणार आहे.''


 या कार्यक्रमामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या पोशाखाचादेखील आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. आज आपण संतांची वेशभूषा केलेली आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपले आयुष्य घडवावे. आपल्या घरामधील मुलांवर संतांच्या विचारांचे पालक देखील अभिनंदनास पात्र आहे असे ते यावेळी म्हणाले.


 

मुलांमध्ये विविध कलागुण असतात. या कलागुणांना योग्य वाव मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. तसेच अशा उपक्रमांमुळे मुलांच्या बालमनावर चांगले संस्कार होतात. त्या अनुषंगाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. सदर सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे मागील वर्षीदेखील आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. या वर्षीदेखील स्पर्धेचे व्यापक स्तरावर आयोजन करण्यात आले. या वर्षी स्पर्धेमध्ये ४००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये पहिल्या फेरीत १७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामधून दुसऱ्या फेरीसाठी १८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.


 


आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयो`जित स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत, वारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषा सादर केल्या. फॅशन डिझायनर शुभांगी भोईटे, विशाखा शेरे, आणि रिलायन्स प्रतिनिधी सुचित्रा झणकार या परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले.


 


स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे –


इयत्ता १ली ते ४थी गट


 प्रथम क्रमांक- वैदेही नितीन कणसे (ज्ञानदीप विद्या मंदिर),


 द्वितीय क्रमांक- चारवी गणेश चालखोर (मॉडर्न प्राथमिक स्कूल यमुनानगर निगडी),


  तृतीय क्रमांक- अनघा अर्जुन जगताप (जय हिंद प्राथमिक शाळा),


उत्तेजनार्थ - सौम्या परचंडे (इंदिरा नॅशनल स्कूल),


 तन्मय विजय कांबळे (निगडी मुले मुली क्र.2/2),


सान्वी निंगय्या हिरेमठ (मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल),


लक्षण्या दिनेश अटवाल (ज्ञान प्रबोधिनी नव नगर विद्यालय, निगडी),


 


इयत्ता ५वी ते ७वी गट


 प्रथम क्रमांक- अक्षता राहुल सुर्यवंशी (रिव्हरडेल शाळा इंद्रायणीनगर भोसरी पुणे)


द्वितीय क्रमांक- राधिका विश्वनाथ आगरे (पिंपरी चिंचवड महानगर पालिका पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्रमांक 54)


 तृतीय क्रमांक- हिमांशू अमित देसले (मॉडर्न हायस्कूल, निगडी, पुणे44),


उत्तेजनार्थ - जान्हवी सत्यवान मुजमुले (न्यू इंग्लिश स्कूल, भोसरी),


प्रतिक दिगंबर पाटेकर (ॲपेक्स इंटरनॅशनल स्कूल),


वेदांत वैकल्प देवकर(जय हिंद हायस्कूल),


 


इयत्ता ८वी ते १०वी गट-


प्रथम क्रमांक- नम्रता सोमनाथ भांगरे(अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय),


द्वितीय क्रमांक- अंजित दिनेश इंगळे (माध्यमिक शाळा थेरगाव),


 तृतीय क्रमांक- धनंजय भीमराव सावंत (अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)


उत्तेजनार्थ-विघ्नेश रामचंद्र जाधव   (विश्वकर्मा विद्यालय)


 तन्वी विवेक मानकरी (एसव्हीव्हीएन)


सायोम कृष्ण डोळस (अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)


 


 पीसीएमसी स्मार्ट सारथीचे आशिष चिकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या पौर्णिमा भोर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार देखील मानले.

----------