सोमनाथ शिनगारे यांना पी.एचडी. प्रदान
पिंपरी, ता. १२ : मोशी येथील सोमनाथ बाळासाहेब शिनगारे यांना दि थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस फ्रांस या विद्यापीठाने पीएचडी पदवी बहाल केली. शिनगारे यांनी " बिझनेस मॅनेजमेंट रेफरन्स जॅगरी टी प्री-मिक्सेस " या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली.
थेम्स विद्यापीठातून शिनगारे हे '' गुळाचा चहा '' या विषयामध्ये पदवी मिळविणारे पहिलेच भारतातील उद्योजक आहेत. यासाठी प्रा. राकेश मित्तल यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. थायलंड येथे झालेल्या आशिया- पॅसिफिक शैक्षणिक परिषदेत, आदीपू विद्यापीठाचे प्रमुख डॉ जिदप्पा थेवारिन, थेम्स विद्यापीठाचे ॲकॅडमीक संचालक डॉ इर्विन डेलीन टोरस यांच्या हस्ते हि पदवी बहाल करण्यात आली.
-------------
