26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

संजय कुलकर्णी सुपेकर यांना डॉक्टरेट


पुणे, ता. १ : जर्मनी येथील हेसेन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने यावर्षी समाजसेवेमधून देण्यात येणाऱ्या डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी महाराष्ट्रातून ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता तथा महाराष्ट्र युनियन ऑफ जनरलिस्टचे मराठवाडा अध्यक्ष संजय कुलकर्णी सुपेकर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.


पुणे येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जर्मनी विद्यापीठाच्या प्रमुख अतिथींसह सेलिब्रिटी हिंदी चित्रपटातील सुपरस्टार अमिषा पटेल यांच्या हस्ते या दोघांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी डॉक्टर संजय सुपेकर म्हणाले, '' या डॉक्टररेट पदवीचे संपूर्ण श्रेय समाजासह मित्रपरिवार, सर्व पदाधिकारी, विविध संघटना, मला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणारे माझे सहकारी गुरुवर्य, हितचिंतक यांनाच असल्याचे डॉक्टरेट पदवी घेताना सांगितले, माझे उर्वरित आयुष्य समाजकार्यासाठीच पूर्ण वेळ असेल.'' 

------