रावेत येथे रस्ता रुंदीकरणाची कारवाई
पिंपरी, ता. २६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागातंर्गत भक्ती शक्ती ते मुकाई चौक या बीआरटी कॉरीडॉर वरील ४५ मीटर उर्वरीत रस्ता विकसित करण्यासाठी नगरचना व विकास विभागामार्फत कळविलेनुसार मंजूर विकास आराखड्यानुसार सदर रस्त्याचे भूसंपादन विशेष अधिकारी, पिंपरी यांनी दि.१४/१०/२०१८ रोजीच्या निवड्यानुसार केले होते. सदर भूसंपादनाच्या अनुषंगाने बुधवारी (ता. २५) मूळ मालकांनी अडथळा करून अडवलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या कारवाईस ३ पोकलेन, ४ जेसीबी, ५ डंपर सोबत पोलिस शाखेचे ७ महिला काँस्टेबल, ११ पुरुष काँस्टेबल व १ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ७ महिला व १३ पुरुष यांचेसह पिपंरी चिंचवड मनपाचे अ क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण विभागाकडील १० मजुर कर्मचारी होते. नगररचना विभागाचे २ सर्व्हेअर व अभियंता उपस्थित होते. स्थापत्य प्रकल्पाचे प्रमोद ओंभासे, प्र. मुख्य अभिंयता-१ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड व विजय भोजने, उप अभियंता संजय काशीद, सुनिल पवार,व ५ कनिष्ठ अभियंता यांनी कारवाई केली. उर्वरीत कारवाई पुढील दोन दिवस चालू राहणार आहे. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर सदरचा रस्ता ४५ मीटर रुंदीच्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी,किवळे येथील माळवले नगर या ठिकाणची वाहतूक सुरळीत होणार असल्याचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
-------