24.67°C Pune
Friday, July 31
Breaking News:
image

पवना धरणातून विसर्ग सुरु

पिंपरी, ता. ८ : पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये ७७.५४ 4% भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये येवा प्राप्त होत आहे.

 सकाळी ८ च्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने २८०० क्युसेक्स मुक्त विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो, याची नोंद घ्यावी.

  तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावित. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे.

------------------------------------------------------