पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
पिंपरी, ता. १४ : पवना धरणाच्या पाटलोट क्षेत्रात शनिवारी रात्रभर दमदार पाऊस झाला. त्यामुळे एका दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा रविवारी (ता. १४) सकाळी सहापर्यंत २८.७७ टक्के झाला. त्यानंतर दुपारी ३.४५ पर्यंत ३०.५९ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा वाढला.
पवना धरणाच्या पाटलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभरात १३२ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ७२३ मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी आतापर्यंत ६५५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी ३०.५५ टक्के इतकी होती.
पाणीसाठ्यात ११.३४ टक्के वाढ
पावसाळा सुरु होण्यापूर्वी पवना धरणात १७.४४ टक्के पाणी साठा होता. त्यामध्ये आतापर्यंत ११.३४ टक्के इतकी वाढ झाली आहे.
-----------
