26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

' पीसीसीओईआर ' च्या एनएसएस विभागाकडून जुन्नरला वृक्षारोपण

पिंपरी, ता. १३ : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधन, घाटघर येथे वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये ५० जंगली झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आणि १२०० सीड बॉलचे रोपण करण्यात आले. तसेच दुर्ग भेट व परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

  ' पीसीसीओईआर ' चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात इतिहास संशोधक अमर गायकवाड यांनी जीवधन किल्ल्याचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र साळुंके, टीम महाराष्ट्र रेंजर्सचे प्रा. प्रदीप गायकवाड, प्रा. अश्विनी भावसार, जुन्नर वन विभागाचे प्रदीप चव्हाण, राजेंद्र गायकवाड आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. 

   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय हे शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असते.

------------------------------