26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

पिंपरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पिंपरी, ता. ६ : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (ता. ६) अभिवादन करण्यात आले.


   महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त विठ्ठल जोशी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, गिरीश वाघमारे, युवराज दाखले,कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, बालाजी अय्यंगार तसेच जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे,अंकुश कदम,अनिल कु-हाडे आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.



 भीमसृष्टी पिंपरी येथील तसेच हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी परिसरातील आणि दापोडी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. एच.ए. कॉलनी येथील कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संजय केंगले,रमेश जाधव, मिलिंद जाधव, सुरेंद्र पासलकर, सुरेश केंगले यांच्यासह कंपनी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.


दापोडी येथील कार्यक्रमास पोलीस अधिकारी निलेश वाघमारे,भास्कर जाधव तसेच माजी नगरसदस्य रोहित काटे,राजू बनसोडे, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे,माई काटे,आशा धायगुडे शेडगे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

--------