पिंपरी-चिंचवडमध्ये आप आदमी पक्षाला नवे बळ – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश गायकवाड यांचा पक्षप्रवेश!
पिंपरी, ता. ६ : ओबीसी समाजासाठी सातत्याने झटणारे ज्येष्ठ समाजसेवक सुरेश गायकवाड यांनी अधिकृतपणे आप आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अरुणा गायकवाड या २००२ ते २००७ या काळात नरसेविका म्हणून कार्यरत होत्या.
त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपळे निलख परिसरात आम आदमी पक्षाचे संघटन अधिक बळकट होणार आहे, तसेच सामाजिक समरसतेच्या कार्यात नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गायकवाड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी आणि स्थानिक विकासासाठी लढा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपळे निलख परिसरात अनेक सामाजिक उपक्रम आणि प्रकल्प राबवले गेले आहेत.
आप आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अजित आपके पाटील साहेब यांच्या हस्ते व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी पक्षाचे वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, यल्लाप्पा वालदोर, पुणे शहर युवक शहराध्यक्ष अमित मस्के, दत्तात्रेय काळजे, चंद्रमणी जावळे, सुनील शिवशरण, शुभम यादव, अजय सिंग इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
