30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ' स्वच्छता ही सेवा ' पंधरवड्याचे आयोजन

पिंपरी ता. २८ : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून संपूर्ण देशभरात १७ सप्टेंबर २०२४ ते २ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ' स्वच्छता ही सेवा ' पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या वर्षी ' स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता ' हे अभियान राबविणेबाबत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाने कळविले आहे.


त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सद्यस्थितीत सुरु असलेल्या 'स्वच्छता ही सेवा २०२४' या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ निगडी यांचे संयुक्त विद्यमाने रविवार (ता. २९) निगडी ते नाशिक फाटा या मार्गावर "एक धाव स्वच्छतेसाठी" व 'रनॅथौन ऑफ होप' चे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये परिसर स्वच्छतेचे व सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटावे हा आहे. त्यासाठी या उपक्रमामध्ये महापालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये स्वच्छता व इतर उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.


तरी "एक धाव स्वच्छतेसाठी" व 'रनॅथॉन ऑफ होप' या उपक्रमामध्ये नागरिकांनी बहूसंख्येने सहभागी होऊन "स्वच्छता ही सेवा २०२४" हे अभियान यशस्वी करावे यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जाहीर आवाहन आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी केले आहे.

--------