24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी राबविणार ‘’एक पेड माँ के नाम’’ संकल्पना

पिंपरी, ता. ६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘’एक पेड माँ के नाम’’ ही संकल्पना राबविण्याबाबत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या भारत मातेबद्दल कृतज्ञता म्हणून देशी प्रजातीचे एक झाड लावणे आवश्यक आहे. यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.


शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता परिसर पाहता पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढ, अतिउष्णतेच्या तीव्र लाटा, ऋतूमानातील बदल या सर्वांची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी याबाबतचा सर्वांगीण विचार करुन मा. पंतप्रधान महोदय यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 'एक पेड माँ के नाम' ही संकल्पना राबविण्याबाबत जनतेला आवाहन केले आहे.


धरणी मातेचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैली अंगीकारण्यासाठी आपण सर्वजण वचनबद्ध आहोत. तसेच आपल्या धरणीमातेला अभिवादन म्हणून आताच्या पावसाळ्यामध्ये दररोज किमान देशी प्रजातीचे एक झाड लावल्यास, धरणीमातेसाठी ही अनमोल भेट ठरेल असे या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे.


या संकल्पनेच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या भारत मातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशी प्रजातीचे किमान एक झाड लावणे आवश्यक आहे. त्यासाठी उदयान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने मोफत रोपे पुरविण्यात येणार आहेत. हा उपक्रम १५ चे ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार असून स्वत: आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.


 -----------