24.11°C Pune
Thursday, July 30
Breaking News:
image

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

पिंपरी, ता. १४ : राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था,मुंबई यांच्यामार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित सावित्रीबाई फुले अकादमी,वाकड तसेच इतर प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण संस्थामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ साठी पूर्णवेळ विनामूल्य निवासी प्रशिक्षण देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचे २७ जुलै २०२५ रोजी आयोजन केले आहे. 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील रहिवासी पुरावा असलेल्या सर्व संवर्गातील ५० विद्यार्थ्यांना सावित्रीबाई अकादमीमध्ये ११ महिन्याकरिता प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास व्यवस्था, प्रतिमहा रु.४०००/- प्रमाणे विद्यावेतन , अद्ययावत पुस्तकांसह ग्रंथालय, एसी अभ्यासिका,व्याख्यानकक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत तसेच तज्ञांचे मार्गदर्शन देखील उपलब्ध करुन देण्यात येते.


या प्रवेश पक्रीयेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरूवात ३ जुन पासून झाली असून २७ जून २०२५ पर्यंत ही मुदत आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याकरिता www.siac.org.in , www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अकादमी, वाकड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अकादमीचे संचालक रंगनाथ नाईकडे यांनी केले आहे. 

---------------