पाणी, वाहतूककोंडीची समस्या सोडविणार; पिंपळे सौदागरला आणखी स्मार्ट बनविणार
पिंपरी, ता. ११ : चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी पिंपळे सौदागर भागातील ग्रामस्थ आणि सोसायट्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावला आहे.
मला बहुमताने निवडून आणण्यासाठी सोसायटीधारकांनी घराघरात आणि मनामनात "कमळ" पोहोचवावे असे आवाहन, यावेळी शंकर जगताप यांनी या भेटीगाठींदरम्यान केले. याप्रसंगी माजी नगरसेवक नाना काटे, भाजप कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे,माजी नगरसेविका निर्मला कुटे, कुंदा भिसे, उन्नती फाउंडेशनचे संजय भिसे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप काटे, निलेश काटे, अरुण चाबुकस्वार, उमेश काटे, राकेश काळे, संकेत कुटे, अतुल पाटील, मच्छिंद्र काटे, राजू शेलार, अण्णा शेलार, बाबू शेलार, नवीन लायगुडे, रेश्मा कुलकर्णी, विना श्रीवास्तव, दीपक तारे, बबन दांडगे, प्रमोद चौधरी, प्रशांत घोषाल, शिवाजी काटे, राहुल कुलनकर, संतोष भापसे, हरिदास बदाले, कपिल कुंजीर संदेश काटे, गिरीश जाचक, भानुदास काटे यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रचार दौऱ्यादरम्यान परिसरातील गणेशम सोसायटी, सेलेनिओ सोसायटी, शुभम सोसायटी, यास्मिन सोसायटी, मयुरेश्वर सोसायटी, सुखवानी सोसायटी, सलेनीओ सोसायटी, साई अंबिअन्स सोसायटी, साईपर्ल सोसायटी, शर्वरी सोसायटी, पूर्वा रेसिडेन्सी सोसायटी, समृद्धी सोसायटी, पार्क रोज लँड गेट सोसायटी, कुणाल आयकॉन सोसायटी, गणेश ग्रेसलँड सोसायटी, दीपमाला सोसायटी, मिरचांदानी पाम्स सोसायटीसह अनेक सोसायटींना भेट दिली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य व सोसायटीमधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट
- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वात विकसित गाव म्हणून पिंपळे सौदागरची ओळख आहे. लोकनेते स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित झालेला हा परिसर पिंपरी चिंचवडच्या सौंदर्यात भर घालतो. या विकासाला गती देण्यासाठी आणि चिंचवड विधानसभेमध्ये सर्वत्र विकासाचा वटवृक्ष वाढविण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळावा ही विनंती. तसेच पिंपळे सौदागर वासीयांसह संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये पाणी, वाहतूक आणि कचरा व्यवस्थापनाच्या कोणत्याच समस्यांना सामोरे जावे लागणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो.
- शंकर जगताप
----------------
