23.41°C Pune
Monday, March 16
Breaking News:
image

पुणे मेट्रोच्या पीसीएमसी-निगडी मेट्रो खांब (पिलर) बांधण्याचे काम सुरू

पुणे, ता. ६ : पुणे मेट्रोच्या पीसीएमसी-निगडी मार्गावरील पहिल्या खांबाच्या पायाचे काँक्रीटच्या (Piller foundation concrete) कामाला अण्णाभाऊ साठे पीएमपीएमल बस आगार, निगडी येथे भक्ती-शक्तीजवळ शनिवारी (ता. ६) सुरुवात झाली. 


सर्व आवश्यक भू-तपासण्यांनंतर हा महत्त्वपूर्ण या कामाला सुरुवात करण्यात आली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह, संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोद अग्रवाल, कार्यकारी संचालक प्रशासन आणि जनसंपर्क डॉ. हेमंत सोनवणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि इतर मेट्रो आणि पीसीएमसी व पीएमपीएमलचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उत्तर-दक्षिण मार्गिकेवरील पिंपरी चिंचवड ते निगडी (भक्ती शक्ती चौक) या ४.५१९ किमी लांबीच्या उन्नत मार्गिकेच्या व्हायाडक्टचे काम दिनांक १५ मार्च २०२४ रोजी रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) या कंपनीला देण्यात आले आहे. हा प्रकल्प १३० आठवड्यांत पूर्ण होणार आहे आणि त्यात चार स्थानके असतील: चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती. या मार्गाच्या बांधकामासाठी १५१ स्पॅन आणि ११८१ सेगमेंट ची आवश्यकता लागणार आहे. RUNL ने तळेगाव जवळ सेगमेंट व गर्डर बनावीन्याला सुरुवात केली आहे. 

हा विस्तार पुणे मेट्रो फेज-१ च्या मार्गिका -१ चा नैसर्गिक विस्तार आहे. याचा उद्देश सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि प्रवासी संख्या वाढवणे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या कार्यक्षेत्रात स्थित, ज्याला “इंडियाज मोटर सिटी” म्हणून ओळखले जाते  


विस्तार मार्ग पिंपरी चिंचवड क्षेत्रातील प्रमुख भागांना जोडेल. चिंचवड स्थानक व्यावसायिक, निवासी, औद्योगिक आणि धार्मिक स्थळे आणि चिंचवड भारतीय रेल्वे स्थानकाशी जोडण्यात येईल. आकुर्डी स्थानक निवासी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांची पूर्तता करेल; निगडी आणि भक्ती-शक्ती स्थानके निवासी, मनोरंजन आणि धार्मिक स्थळे जोडलीत आणि देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या निमशहरी भागांना जोडणाऱ्या शहर बस आगारांशी जोडण्यात येतील. 


या नवीन मेट्रो विभागामुळे देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या उपनगरी भागातील अनेकांना तसेच पीसीएमसी, निगडी आणि आकुर्डी येथील रहिवाशांना सुधारित कनेक्टिव्हिटी मिळाल्याने फायदा होणार आहे. 


यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गाच्या कामाची आज सुरुवात होत आहे. या मार्गामुळे या विभागातील मोठ्याप्रमाणात असणारा रहिवासी भाग, कारखाने, शाळा, कॉलेज मेट्रोने जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या कामासाठी पीसीएमसी तर्फे सर्वोतपरी मदत करण्यात येईल.”


या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “पीसीएमसी ते निगडी या विस्तारीत मार्गामुळे या परिसरातील रवासी भाग मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत. नियोजित १३० आठवड्याच्या वेळात हे काम पूर्ण करण्यासाठी मेट्रोने नियोजन केले आहे. आणि त्या अनुषंगाने वेगाने काम सुरु केले आहे.”

---------