पालखीसाठी वैद्यकीय विभाग सज्ज
पिंपरी, ता. ३० : दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होऊन सदर पालख्या पुढे मार्गस्थ होतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत याकामी खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले होते.
यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी माहिती दिली.
१. मनपाच्या आठ रुग्णालयातील १० % खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. तसेच एकूण २३ खाजगी रुग्णालयातील १० % खाटा राखीव ठेवण्यात आल्या होत्या.
२. मनपाच्या सर्व रुग्णालयात वारकऱ्यांसाठी पालखीच्या दिवशी केस पेपर व उपचार मोफत करण्यात आले होते.
३. एकूण १५०० प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले.
४. संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर ५ व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गांवर ३ अशा एकूण ८ रुग्णवाहीका दोन्ही पालखी मार्गांवर आवश्यक मनुष्यबळासह ठेवण्यात आलेल्या होत्या. सर्व रुग्णवाहिका पथकांसोबत आवश्यक मनुष्यबळ होते ज्यामध्ये स्त्रीरोग तज्ञ् यांचा देखील समावेश करण्यात आला होता.
५. खाजगी रुग्णालयाकडील ३ रुग्णवाहिका व एक कार्डीयाक रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आलेली होती.
६. संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर ५ व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गांवर ३ असे एकूण ८ वैद्यकीय पथके तयार करण्यात आलेले होते. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ् यांचा देखील समावेश करण्यात आला होता.
७. एकूण ४ ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आलेली होती.
८. एक रुग्णवाहिका व त्यासोबत एक वैद्यकीय पथक पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर अशा संपूर्ण मार्गांवर पालखी सोबत तैनात करण्यात आलेली आहे.
---------------