पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरात स्वागत
पिंपरी, ता. ३० : पंढरपूर येथून विठूरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवास करुन देहू नगरीच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे तसेच दिघी नगरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. ३०) पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे तसेच वारकऱ्यांचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे स्वागत अतिरीक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि चंद्रकांत इंदलकर यांनी केले. यावेळी पिंपरीगाव येथील काळभैरवनाथ मंदिर येथे विसाव्याच्या ठिकाणी आरतीदेखील करण्यात आली.
या प्रसंगी माजी महापौर संजोग वाघेरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, उषा वाघेरे, प्रभाकर वाघेरे, मुख्य लिपिक वसीम कुरेशी तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दिघी येथे महापालिका क्षेत्रात आगमन झाल्यानंतर उप आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी महापालिकेच्या वतीने स्वागत केले. यावेळी प्रशासन अधिकारी नाना मोरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे तसेच एमएसएफ जवान आणि महापालिका कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------
