पुढील चार -पाच दिवस पाऊस कमी
पुणे, ता. १३ : महाराष्ट्रात (मुंबई, पुणे शहरातही) पुढील ४-५ दिवस पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे: कोकणातील जिल्ह्यांमध्ये पाऊस व्यापक प्रमाणात, तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुलनेने कमी पण बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. पुणे शहरात फार हलकासा ते तुरळक हलका पाऊस होण्याची शक्यता असून, पुण्याच्या घाट भागात मध्यम ते तुरळक जोरदार पाऊस होऊ शकतो; मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट/गडगडाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-----------