नव्या जाहिरात रोटेशन प्रणालीचे कर्मचाऱयांना प्रशिक्षण
पिंपरी, ता. १२ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या नव्या जाहिरात रोटेशन संगणक प्रणालीचे प्रशिक्षण कर्मचा-यांना देण्यात आले.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात जाहिरात रोटेशन संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपआयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, तसेच विविध विभागातील संगणक चालक, लेखापाल, उपलेखापाल, मुख्य लिपिक, लिपिक, कर्मचारी आदी उपस्थित होते.
महापालिकेतील माहिती व जनसंपर्क विभागासाठी नव्याने जाहिरात रोटेशन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासंदर्भात जाहिरात आणि निविदा प्रसिद्धी संबंधीत कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.
------
