31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

पिंपरी, , ता २१  चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन अत्यंत उत्साह, श्रद्धा आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे केवळ बौ‌द्धिकच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक विकास साधावा, या हेतूने शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाला नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित गोरखे, कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर, पालक संघ, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


योग दिनाचे औचित्य साधून शाळेत तीन स्वतंत्र सत्रांमध्ये योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते


१) विद्यार्थ्यांसाठी (इ. १ ली ते १० वी)


२) पालकांसाठी


३) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी


या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम, श्वसनाचे तंत्र, तणावमुक्ती आणि मानसिक शांती या विषयांवर माहिती देण्यात आली. "योगामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते, आणि माणूस सर्वदृष्ट्या समृद्ध होतो" हे विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले. या व्यतिरिक्त योग दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा आणि पोस्टर मेकिंग उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ह्या उपक्रमांवरे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड आणि शिक्षकांनीही स्वतः सहभाग घेत योगाचे प्रात्यक्षिक दाखवले. पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल व नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यापक आणि सुसंस्कृत शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीचा स्वीकार आणि योगाबद्दलची जागरुकता वाढवण्यास निश्चितच मदत झाली.

-------