31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे : आयुक्त शेखर सिंह


पिंपरी, ता. २४ : '' संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होत असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत आहे. संभाव्य धोका विचारात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे '', तसेच कोणीही नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.     

     अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या निर्देशानुसार मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी हे शहरातील घाटांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शहरातील नदीकाठच्या असणाऱ्या वस्त्यांमध्ये महानगरपालिकेचे पथक बारकाईने लक्ष ठेवून असून तेथे आवश्यक आपत्कालीन यंत्रणा देखील तैनात ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता पूरपरिस्थिती उद्भवल्यावर नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.


 आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणा-या सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिकेने सर्व प्रभाग तसेच सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पुर नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असूनसर्व कक्ष २४ X ७(२४ तास ७ दिवस) कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यूसाठी घटनास्थळी एनडीआरएफ तसेच पोलीस यांच्याशी समन्वय साधून त्यांना पाचारण केले जाणार आहे. संभाव्य धोका लक्षात घेता अग्निशमनचे कर्मचारी शहरात अनेक ठिकाणी फिरतीवर आहेत. रात्रीच्या वेळी देखील पावसामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास शहरात अग्निशमन यंत्रणा सज्ज असून अग्निशमनची टीम रेस्क्यूसाठी आवश्यक त्या सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळावर पोहोचण्यासाठी २४ X ७ (२४ तास ७ दिवस) कार्यान्वित आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त इंदलकर यांनी दिली आहे.

महत्वाचे दूरध्वनी क्रमांक

मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष-    ०२०- २८३३११११ / ६७३३११११

 

अग्निशमन केंद्रांचे संपर्क क्रमांक

क्र.

अग्निशमन केंद्राचे नांव

पत्ता

दुरध्वनी क्रमांक

जन.अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी

संत तुकाराम नगर,

पिंपरी -१८.

२७४२३३३३

२७४२२४०५

९९२२५०१४७५

उप अग्निशमन केंद्र, भोसरी

लांडेवाडी, भोसरी

८६६९६९२१०१

९९२२५०१४७६

उप अग्निशमन केंद्र, प्राधिकरण

सें.क्र २३ प्राधिकरण,

निगडी – ४४

२७६५२०६६

९९२२५०१४७७

उप अग्निशमन केंद्र, रहाटणी

सं.न. १, औंधरोड, रहाटणी,

पुणे – १७.

८६६९६९३१०१

९९२२५०१४७८

उप अग्निशमन केंद्र, तळवडे

आयटी पार्क जवळ, लक्ष्मी नगर, तळवडे

२७६९०१०१

९५५२५२३१०१

उप अग्निशमन केंद्र,

चिखली

जाधववाडी. चिखली

२७४९४८४९

८६६९६९४१०१

 

 


------------------