मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला भेट
पिंपरी, ता. २४ : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी (ता. २४) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनाला भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या महापालिकेतील विविध विभागांतील उपक्रम तसेच कार्यपद्धती समजून घेतली व सुरु असलेल्या विकासकामांची माहिती घेतली.
या शिष्टमंडळामधील मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह अतिरिक्त शहर अभियंता दीपक खांबीत, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोरडे, सहाय्यक आयुक्त योगेश गुणिजन, सहाय्यक आयुक्त स्वप्निल सावंत, प्रक्प प्रमुख कैलास गिते, घन कचरा व्यवस्थापन तज्ञ अक्षय ढबाले, आय ईसी तज्ञ विनीत चौहान, एसबीएम एमआयएस तज्ञ रोहन घुले,उपआयुक्त कल्पिता पिंपळे, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे, सहाय्यक आयुक्त नरेंद्र चव्हाण, विधी अधिकारी सई वडके, उप मुख्य उद्यान अधिक्षक नागेश विरकर, सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले, प्र. सहाय्यक आयुक्त दत्तात्रय वरकुटे, लॉरेटा घाडगे, अभियान तज्ञ लक्षिता खेमाणी, पर्यावरण सल्लागार शरयू जाधव, शहर समन्वयक राधिका चतुरकर, उप आयुक्त प्रसाद शिंगटे, मुख्य एल्खा व वित्त अधिकारी डॉ. कालिदास जाधव, सहाय्यक आयुक्त चंद्रकात बोरसे, प्रशासकीय अधिकारी चारुशीला खरपडे, समाज विकास अधिकारी दिपाली पोवार, टेंडरिंग विभागाच्या मनस्वी म्हात्रे, प्र. सहाय्यक आयुक्त जितेंद्र कांबळे, शहर समन्वयक पोर्णिमा पवार, सीएसआर तज्ञ माशुमी संखे, क्षेत्र अधिकारी अमित दंडवते, विघ्नेश पाथे हे सहभागी झाले होते.
दौऱ्याच्या सुरुवातीला आयुक्त शेखर सिंह यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांचे स्वागत केले.यावेळी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी रोड असिस्टंट ॲन्ड मॅनेजमेंट सिस्टीम,सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी करसंकलन प्रणाली,उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जमा होणारा मालमत्ता कर व झोपडपट्टी भागातून संकलित केला जाणारा कर या विषयावर सविस्तर माहिती दिली. या शिवाय मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी डीएमएस तसेच संगणक प्रणाली, सह शहर अभियंता बापू गायकवाड यांनी शहरी दळण वळण, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल यांनी पर्यावरण, जलःनिसारण आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे यांनी आरोग्य,उपआयुक्त प्रदीप ठेंगल यांनी नागरी सुविधा केंद्र,प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांनी शिक्षण,सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांनी उद्यान,उप आयुक्त राजेश आगळे यांनी आकाशचिन्ह व परवाना, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी समाज विकास तसेच विविध विभागातील प्रमुखांनी संगणकीय सादरीकरण केले.विभागांचे निरीक्षण केले व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पथकाने संबंधित विभाग प्रमुखांकडून कार्यपद्धती व उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. रस्ते विकास विभागाच्या जीआयएस प्रणालीद्वारे रस्त्यांचे मोजमाप व इतर विकासकामांची माहिती पथकाने घेतली. उद्यान विभागाच्या १९७ उद्यानांची माहिती व बायोडायव्हर्सिटी पार्क उपक्रमाचे पथकाने कौतुक केले. समाज विकास विभागाच्या दिव्यांग भवन, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प,लिनियर गार्डन,कासारवाडी येथील जलःनिसारण प्रकल्प,कचरा व्यवस्थापन प्रकल्प,सायन्स पार्क,पिंपळे गुरव येथील डायनोसार पार्क,अशा विविध ठिकाणी जाऊन तेथील कार्यपध्दतीची माहिती पथकाने घेतली.
येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्तुत्य उपक्रम आगामी काळात मीरा भाईंदर महानगरपालिकेतही राबविण्याचा मनोदय देखील शिष्ठमंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
-------------
