मुळशी धरणातून निसर्गात वाढ
पिंपरी, ता. १४ : मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ११०० कुसेक सुरू असणारा विसर्ग सायंकाळी ६ वाजता ३५०० क्युसेक करण्यात येईल, तसेच पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
------