31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना विजयी मताधिक्य देण्याचा सांगवीकरांचा निर्धार

पिंपरी, ता. १४ : जुनी सांगवीतील नागरिकांनी स्व. लक्ष्मणभाऊ आणि त्यांच्या कुटुंबावर कायम प्रेम केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आताही तेच प्रेम आणि तोच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहून या विधानसभा निवडणुकीतही आमच्या विजयाचा विश्वास दुणावला असल्याची भावना; आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली.


चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी जुनी सांगवी परिसरातील मधुबन सोसायटी, शितोळे नगर, पवार नगर, लक्ष्मी नगर, ममता नगर, पवनानगर, प्रियदर्शनी नगर, शिवांजली रोड भागात बैठका, कोपरा सभा तसेच महिला बचत गटांशी संवाद साधला.


जुनी सांगवी परिसराचा कायापालट स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे झाला. त्यांचाच वारसा पुढे चालवणारे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना विजयी मताधिक्य आम्ही देणार असल्याचा निर्धार, जुनी सांगवी परिसरातील नागरिकांनी यावेळी केला.


यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, सुषमा तनपुरे, सोनाली जम, उज्वला सुनील ढोरे, मंदाकिनी तनपुरे, सारिका भंडलकर, संगीता दीक्षित, दर्शना कुंभारकर, सोनाली शिंपी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


---------------------------------------------------------