26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दुसर्‍या टप्प्यातील प्रशिक्षण सत्राला सुरुवात


पिंपरी, ता. ३१ : लोकाभिमुख गतिमान प्रशासन करण्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणच्या दुसर्‍या टप्प्याला शुक्रवार (ता. ३०) आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे सुरुवात झाली. 


 महापालिकेच्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक असणारे प्रशिक्षण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे यांच्या सहकार्याने देण्यात येत आहे. यावेळी महापालिकेचे लिपिक संवर्गातील कर्मचारी उपस्थित होते. हे प्रशिक्षण दि.३०, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे होईल.


प्रशिक्षणाच्या दुसर्‍या टप्प्यातील पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात डॉ. महालक्ष्मी मोरोले यांनी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ' सारांश लेखन कौशल्य ' याबाबत मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात पुणे महापालिकेचे सेवानिवृत्त सहआयुक्त शिवाजी दौंडकर यांनी माहितीचा अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शन केले. तर सायंकाळच्या सत्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी महापालिकेची रचना व कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन केले. 

--------------