30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

महिलांनी संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जावे - सुलभा यादव

पिंपरी, ता. १८ : महिला या अबला नसून सबला आहेत. महिलांनी स्वतःला कमकुवत न समजता प्रत्येक संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जावे. अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सामुदायिकपणे लढा देता आला 

पाहिजे. यासाठी जिजाऊ ब्रिगेड राज्यात सर्वत्र विविध अभियानातून संघटन उभे करत आहे. यामध्ये भोसरी सह इतर सर्व विभागातून युवती, महिलांना जिजाऊ ब्रिगेड मध्ये सहभागी करून घेऊन आपले संघटन मजबूत करावे असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा सुलभा यादव यांनी केले.

  मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने शहरात विविध ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासून ' नारी शक्ती जनजागृती अभियान ' आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचा समारोप नुकताच रामनगर, भोसरी येथे करण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सभासद महिलांचा मेळाव्यात मार्गदर्शन करताना सुलभा यादव बोलत होत्या.

  यावेळी जिजाऊ ब्रिगेड शहर कार्याध्यक्षा रेखा गुळवे, जिल्हा कार्याध्यक्षा अश्विनी पाटील यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या भोसरी विभाग अध्यक्ष सीमा मनस्कार, कार्याध्यक्ष मंगल पडवळ आणि लता खैरे यांची निवड करण्यात आली. तसेच जयश्री भगत, प्रतिभा लवाळे, माधुरी ढाके, नंदा निबळे यांची जिजाऊ ब्रिगेड भोसरी विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जोतसना दुगाणे सचिव, कमल ताठे सहसचिव पदी तर रविशा तांबे, शिला कोठे, सिंधु संभारे, भारती गव्हाणे, रसिका खामकर, शिला काळे, रूपाली वाघमारे, मनिषा हिंगे, शारदा मोरे, माधवी जगताप, मंगल चिमटे, मिरा पवार, मंदाकिनी पाटील, वर्षा दातकर यांची भोसरी विभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी महिलांचा नियुक्तीपत्र व जिजाऊ चरित्र पुस्तक भेट देऊन सुलभा यादव, रेखा गुळवे, अश्विनी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भोसरी विभाग जिजाऊ ब्रिगेड संचलन करणे, वार्ड स्तरावर शाखाविस्तार करण्याची जबाबदारी रेखा गुळवे यांच्याकडे देण्यात आली. रेखा गुळवे आणि श्री नवदुर्गा महिला मंडळाच्या पदाधिकारी व सभासदांनी आयोजनात सहभाग घेतला.

  सूत्रसंचालन अश्विनी पाटील तर आभार रविशा तांबे यांनी मानले.

----------------