26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

लाल बहादूर शास्त्री यांचे कार्य महत्वपूर्ण

पिंपरी, ता. २ : दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला "जय जवान,जय किसान" क्रांतिकारी नारा सर्वश्रुत असून देशाचे पंतप्रधानपद भूषविताना त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी बुधवारी (ता. २) पिंपरी येथे व्यक्त केले.


   पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महापुरूषांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.  


   यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


   महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रजांविरुद्धच्या भारत छोडो अभियानामुळे तसेच असहकार आंदोलनामुळे देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांचे, देशभक्तांचे आदर्श बनले तसेच ते नेहमी स्वच्छतेच्या बाबतीत आग्रहशील असायचे. तर संपूर्ण देशवासीयांचे बळ सैन्यदलाच्या पाठीशी उभे करणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे मुत्सद्दी राजकारणी तसेच प्रखर देशभक्त होते. या दोन्ही स्वातंत्र्यसैनिकांच्या देशभक्तीचा वारसा सर्वानी जोपासला पाहिजे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त इंदलकर यांनी केले.

-------