31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरूपात व्हावा : आमदार अमित गोरखे

चिंचवड, ता. २७ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरुपात व्हावा. राज्यातील नामवंत विचारवंत ,साहित्यिक व कलाकार यांचा समावेश झाला पाहिजे, अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. 

दरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिका लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव साजरा करीत असते त्या पाश्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. तसेच शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी शहरातील नागरिकांचे ,झोपडपट्टीतील विविध प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होते, त्यासाठी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन अमित गोरखे यांनी आयुक्तांशी महापालिकेत चर्चा केली, लवकर या प्रश्नांना सोडवण्यात यावे असे ही यावेळी सांगण्यात आले,  


    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दर वर्षी १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या दरम्यान " प्रबोधन विचार पर्व " च्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव साजरा केला जातो. या जयंती उत्सवामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रातील थोर विचारवंत, कलावंत, यांच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आदान प्रदान केले जाते. त्या भव्य दिव्य कार्यक्रमाला महानगरपालिकेकडून जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतील अध्यक्ष व समिती सदस्यांना सोबत घेऊन माननीय आयुक्तांची यासंदर्भात चर्चा केली असता आयुक्तांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी अमित गोरखे म्हणाले '' पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी मी सदैव तयार आहे त्याचबरोबर महानगरपालिका असो किंवा राज्यसरकार असो यांच्या माध्यमातून मी नक्कीच येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात प्रयत्न करीन.''

--------------