27.45°C Pune
Monday, June 15
Breaking News:
image

लग्न होताच नवदाम्पत्याने केले वृक्षारोपण

पिंपरी, ता. २६ : रोटरी क्लब प्राधिकरणाच्या सहकार्याने कासारवाडी येथील नवविवाहित त्रिशाला आगरवाल आणि हिमांशू श्रीश्रीमल या जोडप्याने लग्न लागताच तासाभरात वृक्षरोपण करून वृक्षसंवर्धानाचा संदेश दिला. क्लबचे सदस्य विवेक आग्रवाल यांनी आपली कन्या त्रिशाला हिचा विवाह समारंभ सुस गाव येथे आयोजित केला होता.

यावेळी प्रांतपाल शितल शहा, ग्रीन प्रिओड्सचे अध्यक्ष नीना रायसोनी, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय लंके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रांतपाल यांनी वधु माता पिता पूजा व विवेक आगरवाल यांना पॉल हैरीस फेलो पीन देवून विशेष सन्मानित करण्यात आले. वऱ्हाडी मंडळी आणि सदस्यांच्या उपस्थितीत १०१ झाडे लावली. याप्रसंगी अग्रवाल यांनी रोटरी फाऊंडेशनला एक लाख रुपयांची देणगी दिली. या वृक्षारोपणासाठी सनी निम्हण यांनी जागा उपलब्ध करून देत झाडाचे संगोपन करायची हमी दिली. पर्यावरण पथकाने अर्जुन आणि कदंबच्या ६ ते ७ फूट उंचीचे १०० रोपे उपलब्ध करून दिली. या कार्यासाठी रोटरी क्लब प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय लंके आणि सर्व सदस्य यांनी पुढाकार घेतला.

--------------