कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करणार - प्रवाशांचा संकल्प
पिंपरी, ता. ३० : मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत वल्लभनगर येथील पिंपरी चिंचवड बस स्थानाकातील प्रवाशांशी महापालिकेच्या स्वीप कर्मचाऱ्यांनी संवाद साधला. आपल्या व आपले कुटुंब, समाज, राज्य, पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवर्जून मतदान करणार असल्याचे मत नवमतदारांसह ज्येष्ठ मतदारांनी व्यक्त केले.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. महापलिकेच्या हद्दीत असलेल्या वल्लभनगर येथील पिंपरी चिंचवड बस्थानाकात महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आला. याठिकाणी मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमासह मतदानाची शपथ अधिकारी, कर्मचारी, प्रवाशांना महापालिकेच्या वतीने देण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड बस स्थानकाच्या प्रमुख वैशाली कांबळे, महापालिकेच्या स्वीप टीमचे मुख्य लिपिक किसन केंगले, लिपिक अभिजीत डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार, सचिन महाजन, पियुष घसिंग, श्रेयश जाधव यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी, प्रवाशी कामगार व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्षानुवर्षे याच शहरात राहणाऱ्या कामगारांची पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदारसंघात मतदार म्हणून नोंद आहे. दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरे करण्यासाठी गावाकडे निघालेल्या मतदारांनी महापालिकेच्या स्वीप कर्मचाऱ्यांनी संवाद साधला. आपल्या व आपले कुटुंब, समाज, राज्य, पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवर्जून मतदान करणार असल्याचे मत स्थानकावर उपस्थित असलेल्या नवमतदारांसह ज्येष्ठ मतदारांनी यावेळी व्यक्त केले.
भोसरी आगारात मतदानाची शपथ
महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या भोसरी आगारातील अधिकारी कर्मचा-यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी भोसरी आगाराचे व्यवस्थापक विजकुमार मदगे महापालिकेच्या स्वीप टीमचे मुख्य लिपिक किसन केंगले, लिपिक अभिजीत डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार, सचिन महाजन, पियुष घसिंग, श्रेयश जाधव यांच्यासह पीएमपीएमएल चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आगारातील कर्मचा-यांनी आपल्या परिसरात जाऊन मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करणार असल्याचे सांगितले.
शहरातील विधानसभा पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदारसंघांमधील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-----------