करसंकलन विभागाकडून दोन दिवसात तब्बल १२८ मालमत्ता जप्त
पिंपरी, ता. ३० : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून तीन लाख रुपयांहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, ओद्योगिक, मिश्र मालमत्ता प्राध्यान्याने जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, विभागाने शनिवार (ता. २८) व रविवार (ता. ३०) यादिवशीसुद्धा जप्तीची धडक मोहिम राबविली. यामध्ये शनिवारी ६५ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून रविवारी ६३ मालमत्तावर जप्तीची कारवाई करण्यात आली.
करसंकलन विभागाची जप्तीच्या धडक मोहीम लक्षात घेऊन आणि आपली मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून शनिवारी १३९ मालमत्ताधारकांनी २ कोटी ९१ लाख १३ हजार ७७० तसेच रविवारी ८९ मालमत्ताधारकांनी १ कोटी ८० लाख २४ हजार १३ इतका एकूण तब्बल ४ कोटी ७१ लाख ३७ हजार ७८३ रुपयांच्या रकमेचा मालमत्ता कराचा भरणा केला. सदरची मोहिम सात जानेवारीपर्यंत सलग राबविण्याय येणार असून १ लाखाहून अधिक थकबाकी असणारी एकही बिगरनिवासी ,औदयोगिक आणि मिश्र मालमत्ता जप्ती कारवाईमधून वगळली जाणार नाही.
कोट
शनिवार व रविवार यादिवशी राबविण्यात आलेल्या जप्ती मोहिम यापुढे तीव्र मोहीम स्वरूपात सतत ७ जानेवारीपर्यंत चालूच राहणार असून एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या १०० % बिगरनिवासी, ओद्योगिक, मिश्र मालमत्तावर प्राधान्याने मालमत्ता जप्तीची कारवाई करणेत येणार असून यामधून एकही मालमत्ता वगळण्यात येणार नाही. करसंकलन विभागाकडून अन्य कामास प्राधान्य न देता थकबाकीदारांकडून रक्कम वसुलीस /जप्ती मोहिमेस सर्वाधिक प्राधान्य देणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी आपल्या कराचा ऑनलाईन स्वरूपात भरणा तात्काळ करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी.तसेच जप्त कार्यवाहीचे वेळेस पुढील दिनांकाचे (Post dated) धनादेश कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत .
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी - चिंचवड महानगरपालिका
-----------------
