कामकाजात 'एचआर'ची भूमिका आव्हानात्मक - लीला पूनावाला
पिंपरी, ता. १५ : '' उद्योग व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात ' एचआर 'ची भूमिका आव्हानात्मक असते. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच येणाऱ्या प्रत्येक समस्या, प्रश्न यांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे उद्योग व्यवसायाचे परिचालन नियमित गतीने सुरू ठेवणे शक्य होते,'' असे मत पूनावाला फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री डॉ. लीला पुनावाला यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित, पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि पुणे बिझनेस स्कूलच्या (पीबीएस) वतीने "एचआर एक्सलन्स ॲवॉर्ड - २५" सोहळा शनिवारी (ता. १४) बालेवाडी येथे उत्साहात झाला. यावेळी पीसीसीओईचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पूनावाला फाउंडेशनचे फिरोज पूनावाला, कोरियन असोसिएशनचे भारतातील प्रतिनिधी एडगर ली, निरंतरा इकोचे प्रसन्न राव, महाराष्ट्र इकॉनोमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष सचिन इटकर, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, पीसीसीओईचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीईटी प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ शीतलकुमार रवंदळे, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी त्यागी, आशिष गाकरे आदी उपस्थित होते.
कोणत्याही उद्योग व्यवसायाचा आत्मा म्हणजे एचआर विभाग असतो. व्यवसाय वृद्धीसाठी एचआर अधिकाऱ्यांची गरज आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करणे; प्रसंगी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या बाबतीत एचआरची भूमिका महत्त्वाची असते. देशाच्या भविष्याला आकार देण्याचे काम एचआर प्रतिनिधी करतात , असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील म्हणाले.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे एचआरच्या कामात बदल झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दैनंदिन कामकाजात केला पाहिजे. ज्ञान कक्षा उंचावण्यासाठी आपल्याकडील ज्ञान सहकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे फिरोज पूनावाला यांनी सांगितले.
यावेळी एडगर ली, प्रसन्न राव, सचिन इटकर, जया लक्ष्मी, प्रज्ञा कुलकर्णी प्रदीप गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्यास विविध कंपन्यांमधील ३०० पेक्षा जास्त एचआर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. एचआर एक्सलन्स ॲवॉर्डसाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ५०० पेक्षा जास्त राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमधून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रथम छाननी नंतर १४० प्रवेशिका परीक्षक मंडळाकडे देण्यात आल्या. यामधून ६० जणांची निवड परीक्षकांनी केली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे असे डॉ. गणेश राव यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ. मिनाक्षी त्यागी यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
परीक्षक मंडळामध्ये अमिता खर्डेकर (मास्टरकार्ड), जया लक्ष्मी (गुगल), अभिषेक कुमार (निल्सन आय क्यू), मेघा जशनानी (नॅशडॅग), प्रज्ञा कुलकर्णी (टेलस्ट्रा इंडिया), प्रवीण गांधी (टाटा टेक्नॉलॉजी), समिताभ रॉय (ओवेन फायनान्सिअल सोल्युशन्स प्रा. ली.), राजेश कुमार सिंग (केपीआयटी), डॉ. राजेंद्र हिरेमठ (भाऊ इन्स्टिट्यूट इनोव्हेशन), हेमंत सेठीया (एचआर अँड टीए लीडर), शोभा पांडे (जॉन डियर), डॉ. सदाशिव पाध्ये (किर्लोस्कर न्युमॅटिक), सुकन्या पटवर्धन (माईंड ब्युटिक) आकांक्षा साने (एस. जी. एनॉलिटिक्स), प्रवीण गांधी (टाटा टेक्नॉलॉजी), पूजा बन्सल (सिनियर एचआर लीड), (सीनियर एचआर लीड) या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
चौकट -
विविध नामांकित कंपन्यांमधील ६० एच आर लीडर्स ला यावेळी "एचआर एक्सलन्स ॲवॉर्ड - २५" देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये बेस्ट इन टॅलेंट मॅनॅजमेन्ट अवॉर्ड :- विकास दुबे (डब्ल्यूएनएस ग्लोबल), श्रुती के. भालेराव (डब्ल्यूएनएस, पुणे), प्रीती तोष्णीवाल (झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझ लि. मुंबई), जॉर्ज कार्डोझ (फोर्ब्स मार्शल), बीना गुट्टीकर (टाटा टेक्नॉलॉजीज), आशिष बंका (क्रॅडलवाइज, पुणे), शीतल निंबाळकर (बीओएमएजी इंडिया);
बेस्ट एच आर ऑपरेशन अवॉर्ड :- सुशील नायगर (हिल्टी टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इंडिया), नीरजकुमार शर्मा (कॅविस्टा टेक्नॉलॉजीज), शरद कुंभार (फिनोलेक्स केबल्स लि.), विजयकुमार यादव (केलर ग्राउंड इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि., मुंबई), धीरेन देसाई (अराईज बीपीओ);
बेस्ट इन कॉम्पेटेनसी डेव्हलोपमेंट :- जया गुप्ता (आयजीडब्ल्यू इंडिया टेक्नॉलॉजीज प्रा. लि.), कल्पेश ठाकर (टाटा मोटर्स लि.), धर्मीन ठक्कर (पर्सिस्टंट सिस्टम्स), विद्या पठारे (सारलोहा ॲडव्हान्स्ड मटेरियल्स प्रा. लि.), मृत्युंजय बाळासाहेब ढसाळ (अवलारा टेक्नॉलॉजीज प्रा. लि.)
बेस्ट इन डायवर्सीटी अँड इन्कलुजन अवॉर्ड:- पद्मजा सिंह आर्य (एनएसई कोजेन्सिस-मुंबई), प्रीती आहुजा (हस्क पॉवर), अमित तिवारी (मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीज अँड इंजिनिअरिंग.), अमर जोशी (इन्फिनाईट अपटाइम)
बेस्ट इन टॅलेंट ऍक्वीजीशन अवॉर्ड :- जेम्स जॉर्ज (ईएसएएफ बँक), मनीषकुमार पिपलवा (ईटन), मोहन समशेर (टेक महिंद्रा), योगेश शहा (स्मिथ आणि नेफ्यु), गिरीश कानिटकर (इकोलॅब जीबीएस प्लस पुणे), आलोक सिंह श्रीवास्तव (कॉम्प्युकॉम), अंकुर सिंग (क्लाउडरॉक पार्टनर्स इंडिया प्रा. लि.)
एच आर लीडरशिप अवार्ड:- रवी सिंग (पीडब्ल्यूसी), बल्लीराम मुतगेकर (बीएनवाय मेलॉन), आय. व्ही. एस. रंगनाथ (श्रीराम बायोसीड जेनेटिक्स-डीसीएम श्रीराम लि.), रणजीत सिंग (एनप्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.), अर्चना सारडा (मायक्रोलाइज टेलिमॅटिक्स प्रा. लि.), कॅप्टन पार्थ समई (रिलायन्स जिओ), आदिती आळतेकर (गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप.)
यंग एच. आर. लीडर :- दीप्ती शर्मा (अॅक्सिस बँक), अभिषेक गुप्ता (झेबपे इंडिया.), राहुल दाबी (स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि.), पियुष पांडे (टाटा मोटर्स लि. पुणे), शुल्भा जैन (टाटा टेक्नॉलॉजीज), अंतरीक्ष आर सोनवणे (यार्डी सॉफ्टवेअर), प्रथमेश (न्यूट्रीफ्रेश फार्म टेक इंडिया प्रा. ली. पुणे);
बेस्ट सीएचआरओ अवॉर्ड :- शरद वर्मा (आयरिस सॉफ्टवेअर), मंजुळा राव (फर्स्ट क्राय), विनोद बिडवाईक (सकाळ मीडिया ग्रुप), मोहन पाटील (केएसबी इंडिया लि.), वैभव देशमुख (वेंकीज इंडिया लि. पुणे), माजिद अली खान (सीएमएस आयटी सर्व्हिस);
अनसंग हिरो अवॉर्ड :- सदाशिव चव्हाण, आकांक्षा फाऊंडेशन (राणी चौरे),
महेश रणदिवे, रवींद्र मेटकर, सिद्धेश साकोरे;
लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड :- साहिल नायर (केपीएमजी), सुधीर माटेती (सिंटेल टेलिकॉम);
क्रॉस बॉर्डर इंनोवेशन अँड लीडरशिप अवॉर्ड :- एडगर ली (ह्वासन सोल्युशन, पुणे इंडिया), सुधीर कुलकर्णी (ब्रिजस्टोन इंडिया), प्रसन्न राव (निरंतरा इको), मार्क अँथनी (एचआर लीड) यांचा समावेश होता.
---------------