काळेवाडीत महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई
पिंपरी, ता. ७ : ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने काळेवाडी येथील लकी बेकरी जवळील अनधिकृत पत्राशेड बांधकामांवर सोमवारी (ता. ७ ) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण २२०० चौरस फुट पत्राशेड बांधकाम निष्कासित करण्यात आले.
अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा दल, पोलीस दल, सुरक्षा कर्मचारी आणि मजुर उपस्थित होते.
----
