जनसंवाद सभेत एकूण ७१ तक्रार वजा सूचना प्राप्त
पिंपरी, ता. २७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (ता. २६) जनसंवाद सभेत एकूण ७१ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.
नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले.
जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ७, १३, ७, ९, २, १५, ४ आणि १४ अशा एकूण ७१ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
यावेळी नागरिकांनी पावसामुळे तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करणे, ठिकठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे, पावसाचे पाणी घरात शिरू नये यासाठी रस्त्यांवर पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे, डासांचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घेणे, आवश्यक ठिकाणी किटकनाशक फवारणी करणे, रस्त्यांवरील बंद असलेले पथदिवे दुरूस्त करणे, रस्त्यांवर येणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, सार्वजनिक वाहतूक थांब्यांवर पावसापासून बचाव व्हावा यासाठी उपाययोजना करणे आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
-------------